Saturday, September 8, 2012


देवा अशी काय चूक झाली की तू एवढा आमच्यावर रागावलास,

आमची थोड़ी पण चिंता न करता मोकळ्या ढगांमध्ये हरवलास?

अजुन किती अंत पाहणार आहेस वरुणराजा?
का म्हणून या बळीराजाला देतो आहेस ही सजा?

कुटुंबाचा खर्च,सावकराचे कर्ज आ वसुन उभा आहे,

असा प्रश्न पडतो की खरंच गरीबाला स्वतंत्रपणे जगण्याची मुभा आहे?

रोज ढगांकड़े पाण्याच्या थेंबासाठी पाहून यांचे डोळे दीपून जातात,

आजकाल पावसाने नहीं पण अश्रुनीच त्याचे कपडे भिजुन जातात,

नको सतावु या गरीब जिवाला, आता तरी पानी दे,

नव्याने आयुष्य जगण्यासाठी नव्या आशेची कहानी दे..

No comments:

Post a Comment