Saturday, January 28, 2017

*काहूर*

          *काहूर*


आज तुझ्याशी क्षणभर का होईना बोलावंस वाटतंय..
त्या जुन्या आठवणींच काहूर मनात दाटतंय...

आठवतात का अगणित गप्पांचे ते दिवस अन त्या रात्री,
प्रत्येक दिवसागणिक खुलत जाणारी ती आपली मैत्री..

आठवतं मी तुला माझ्या स्वप्नाबद्दल सांगितलं होतं?
स्वप्नांत पण देवाकडे मी तुलाच मागितलं होतं...

स्वप्नात तू लाल साडी नेसून यायचिस,
पण डोळे उघडताच ना जाणे दूर निघून जायचिस..

तस पाहिलं तर तू नेहमीच मनात असतेस,
पण दरवर्षी आजच्या दिवशी तू आसमंतात दिसतेस्...

देवापुढे हात जोडतो, तुझ्यासाठी प्राथना करतो,
तू सुखात राहावीस यासाठी अगणित नवस धरतो...

प्रत्यक्षात का होईना पण मनाने मी तुला भेटतो,
तुला भेटलेला तो एक क्षणही युगासारखा वाटतो...

खरंच आज तुझ्याशी क्षणभर का होईना बोलावंस वाटतंय..
त्या जुन्या आठवणींच काहूर मनात दाटतंय...

-हृदयस्पर्शी