Saturday, September 8, 2012

*रोज माझ्या स्वप्नांत येतेस तू*

रोज माझ्या स्वप्नांत येतेस तू, 
हळूच माझ्या कानात काही सांगून जातेस तू,
धुंद होते रात्र माझी, धुंद साऱ्या दिशाही, 
तुझ्या पावलांच्या नादाने आसमंतात चढते नशा ही, 
पाहुनी तुझा सुंदर हा मुखडा,
वाटते तू चंद्र नाहीस तर चंद्रच आहे तुझा एक तुकडा,
चंद्र ही हा तुझ्यासमोर किती लाजतो, 
तुझ्या रुपाला पाहून ढगांत जाऊन लपतो,
तुझ्या हास्यरूपी प्रकाशात रात्र सारी न्हाऊन निघते,
तुझ्या हसण्यामुळेच जगाला. एक अन एक चांदणी उठून दिसते,
तुझ्या केसांना उडवण्यासाठी बेभान होतो हा वारा,
त्यामुळे सुगंधित होतो आसमंत हा सारा,
तुझ्या डोळ्यांत पाहिलं की वाटतं, की आता दुसरं काहीच पाहू नये,
असाच बसावे जन्मभर आणि दूर कधीच जाऊ नये,
वाटते मनी मला, हे स्वप्न कधी ना संपावे,
त्यासाठी हवे तर कायमस्वरूपी झोपावे
अशीच स्वप्नामध्ये रात्रीची पहाट कधी होते कळतच नाही,
जागे झाल्यावर तुझ्या आठवणीशीवाय अजून काहीच मिळतच नाही,
तुझी सोबत नसते तेव्हा, नसते काहीच आणि, 
एकटा असतो मी आणि डोळ्यात असते पाणी...
स्वप्नातुनी सत्यात येता जीव हा तडफडतो,
जणू मासा पाण्याबाहेर येऊन फडफडतो.. 
का कधी कळणार नाहीत माझ्या तुला या भावना?
तुजविन सखे मी जगू कैसे एवढे मज सांग ना..

No comments:

Post a Comment