Wednesday, September 5, 2012

*तुझा विचार*

तुझी विचार म्हणजे एक मोर पिसारा,
अंगावर येणारा एक हळुवार नाजूक शहारा,
आठवण तुझी येत सर्वानबद्दलचे भान हरपते,
मन हे वेडे व्याकूळ होऊन केवळ तुझ्यासाठी तडपते,
खोल समुद्रात हरवलेलं मन शोधतंय किनारा,
तुझ्याशिवाय त्याला कोण सहारा?
बाकी साऱ्या छंदापैकी हा माझा आवडता छंद आहे,
माझ्या हृदयाने तुझ्या आठवणींशी जोडलेला तो एक अनुबंध आहे,
तुझ्या आठवणीत मी असा काही गुंततो,
जसा सुरवंट स्वत:ला त्याच्या कोषामध्ये गुरफटतो,
तू येशील ही आजही मनाला आस आहे,
या एका आशेवर जगण्याचा मनाला ध्यास आहे...

No comments:

Post a Comment