तुला कसे मी सांगू आता, तू माझ्यासाठी काय आहेस,
तुला कदाचित नाही समजणार पण खरंच तू माझ्या शरीरातील प्राण आहेस,
प्रत्येक श्वासागणिक तुझी चाहूल होते या मनाला,
तुझाच निरागस चेहरा पाहती माझे डोळे क्षणाक्षणाला,
तुझ्या हास्याची बात काही निराळी आहे,
जणू की पौर्णिमेच्या चंद्राला आलेली ती झळाळी आहे,
तू हसलीस की वाटते, सर्व काही आहे तिथे थांबावे,
वाटते, माझे आयुष्य जेव्हा संपेल तेव्हा तुझे हास्य पाहूनच संपावे,
जेव्हा तुझ्या केसांच्या बटा तुझ्या गालाला स्पर्श करतात,
ना जाणे का पण मला त्या नकळतच चीड आणतात,
तुझ्या डोळ्यात पाहिलं की मला नकळतच एक ओढ लागते,
जणू नदीला समुद्राला भेटायचे हे वेड लागते,
तुझी माझी सोबत ही क्षणाची की जन्माची हे मी नाही जाणत,
पण तुझ्या विरहाची कल्पना पण या मनाला नाही करवत....
No comments:
Post a Comment