Thursday, November 8, 2012

*ऐक माझ्या तू मना*


ऐक माझ्या तू मना,सोड हा हट्टीपणा, 
संपले रे सर्वकाही, हाती आता काही नाही,
स्वप्ने सारी तुटुनी गेली ,दुनिया अपुली लुटुनी  गेली,
काळ ही बघ तो थांबला, सूर्योदय ही बघ लांबला,
चिंब झाले डोळे हे अन चिंब झाले शब्दही,
ओलावली हि वेळ सारी,पाणावले प्रारब्ध ही,
फिर आता परत तू रे, काळरात्र बघ जाहली रे,
पवन ही तो वाहणारा  आज अचानक थांबला,
जणू आपल्या समवेत त्याच्या कार्यकाल हि संपला,
आपुल्या आक्रोशामध्ये बघ धरती ही हेलावली,
जणू त्या प्रभूवर आज निसर्गमाता ही रागावली,
वाटले नव्हते तुला न नव्हते मला ही वाटले,
सुख गवसण्याआधी कसे रे, दुखाने बघ गाठले,
करू नको रे मना तू व्यर्थ आता याचना, 
जाण रे आता जरा कि भोगणे बस यातना... 

-हृदयस्पर्शी 

*इल्तजा*

अंजाने मैं ही सही पर दो पल के लिए तुझसे जुड़ा था..
होश तब आया जब समझा के मेरा नसीब तो कही और ही मुड़ा था,
तकलीफ तो होती है दिल को के तू साथ नहीं होगी मेरे,
बदनसीब तो दिल है ये मेरा, जो अब रहेगा यादों के साथ तेरे..
ऑंखें भी मेरी पागल रोना चाहती है मगर रो नहीं पाती,
तुम्हे आँखोंमें बिठाया है इसलिए सारी सारी रात सो नहीं पाती..
उस ऊपरवाले से ये शिकवा हमेशा रहेगा,
मत तकलीफ दे इस दिल को और के आंसू के जगह इन आंखोसे इक दिन खून बहेगा..

*आला ऑक्टोबर...*

ऑक्टोबर.... माझा आवडता मन प्रसन्ना करायला येतो,
सगळं वातावरण गुलाबी करायला येतो...
गुलाबी वातावरणात गुलाबी थंडी घेऊन येतो,
हळूच आवडत्या व्यक्तीची आठवण करवून देतो,
गुलाबी थंडीमध्ये प्रेमाची चाहूल करून देतो,
पावसाळ्यात ढगांतून पाणी पडताना पाहण्यापेक्षा हिवाळ्यात त्यांच्यासोबत चालायला आवडते,
कोणी सोबत असताना मनाला ढगांसोबत मनसोक्त बागडायला आवडते,
असा हा नवीन अशा घेऊन येणारा ऑक्टोबर मनात नवीन भाव जागृत करतो,
सगळीकडे नवचैतन्याने विश्वास मनात भरतो..
-हृदयस्पर्शी

*नकोस सोडू साथ सखे ग*


नकोस सोडू साथ सखे ग, 
सरून जाईल बघ हे दाट धुके ग,
जाणतो मी तू पाहिली आहेस दुखाची गडद रात्र,
धीर धर राहिले काहीच क्षण मात्र, 
नाही मी चंद्र सूर्य, जे येती आणिक जाती,
मी आहे सोबत तुझ्याच जवळी, जसे शिंपल्यांसमवेत मोती,
मान्य आहे वाट ही खडतर आहे तुझ्या आयुष्याची,
पण होईल सुखकर जेव्हा साथ मिळेल या वेड्या जिवलगाची,
का तू व्यर्थ चिंता करतेस मनी, मी असेन सोबत नेहमी,
जरी नाही राहिले नाही या जगामध्ये इतर कोणी,
प्रेम माझे नाही खोटे, आहे खरे हे तू जाण ग,
तूच आहेस या वेड्या जीवाचा प्राण ग,
एवढ्याने घाबरून तू मानू नकोस हार,
तो बघ आनंदाचा उष:काल दूर नाही फार....
-हृदयस्पर्शी

*दे फकत एकदा माझी साथ*


ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी साथ, 
जरी जगाने फिरवली तुझ्याकडे पाठ, 
तरी मरेपर्यंत सोडणार नाही तुझा मी हात, 
ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी  साथ ...
जेव्हा कधी तुला एकटे वाटेल, 
आणि तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी दाटेल,
काळजी करू नकोस, कसलीही भीती बाळगू नकोस, 
अश्रू तुझे बाहेर येण्याआधीच ते टिपण्यासाठी सरसावतील माझे हे हात,
ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी साथ ... 
दिवसामागून दिवस हे जातील, 
ग्रीष्म ही सरेल, सरेल वसंत, 
सरतील असेच ऋतू अनंत,
पण कधीच सरणार नाही तुझ्यावर माझ्या प्रेमाची बरसात,
फक्त दे तू माझ्या हातामध्ये हात,
ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी साथ ... 
-हृदयस्पर्शी 

*तुझे डोळे*


तुझ्या डोळ्यांत पाहून वाटत कायमस्वरूपी  
त्यांच्यात असं सामावून जावं,जशी नदी मिसळते समुद्रात….
न जाणे काय जादू आहे तुझ्या साध्या पण नयनरम्यी या रुपात..
तुझे डोळे नकळतच काही तरी खुणावतात,
न जाणे का पण ते माझ्यासमोर तुझं खूप काही गुपित खुलवतात,
तुझ्या डोळ्यात पाहून वाटतं, यातून कधीच पाणी येऊ नये,
तुला न आवडलेली गोष्ट कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचू नये,
जेव्हा एखादी गोष्ट सतावेल त्यांना अन ते भिजतील अश्रुने,
बस वाटत एकदा पहाव त्यांनी या वेड्या जीवलगाकडे हक्काने…. ! 
-हृदयस्पर्शी... :)