ऐक माझ्या तू मना,सोड हा हट्टीपणा,
संपले रे सर्वकाही, हाती आता काही नाही,
स्वप्ने सारी तुटुनी गेली ,दुनिया अपुली लुटुनी गेली,
काळ ही बघ तो थांबला, सूर्योदय ही बघ लांबला,
चिंब झाले डोळे हे अन चिंब झाले शब्दही,
ओलावली हि वेळ सारी,पाणावले प्रारब्ध ही,
फिर आता परत तू रे, काळरात्र बघ जाहली रे,
पवन ही तो वाहणारा आज अचानक थांबला,
जणू आपल्या समवेत त्याच्या कार्यकाल हि संपला,
आपुल्या आक्रोशामध्ये बघ धरती ही हेलावली,
जणू त्या प्रभूवर आज निसर्गमाता ही रागावली,
वाटले नव्हते तुला न नव्हते मला ही वाटले,
सुख गवसण्याआधी कसे रे, दुखाने बघ गाठले,
करू नको रे मना तू व्यर्थ आता याचना,
जाण रे आता जरा कि भोगणे बस यातना...
-हृदयस्पर्शी
No comments:
Post a Comment