Thursday, November 8, 2012

*दे फकत एकदा माझी साथ*


ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी साथ, 
जरी जगाने फिरवली तुझ्याकडे पाठ, 
तरी मरेपर्यंत सोडणार नाही तुझा मी हात, 
ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी  साथ ...
जेव्हा कधी तुला एकटे वाटेल, 
आणि तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी दाटेल,
काळजी करू नकोस, कसलीही भीती बाळगू नकोस, 
अश्रू तुझे बाहेर येण्याआधीच ते टिपण्यासाठी सरसावतील माझे हे हात,
ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी साथ ... 
दिवसामागून दिवस हे जातील, 
ग्रीष्म ही सरेल, सरेल वसंत, 
सरतील असेच ऋतू अनंत,
पण कधीच सरणार नाही तुझ्यावर माझ्या प्रेमाची बरसात,
फक्त दे तू माझ्या हातामध्ये हात,
ऐक सखे तू माझी साद, दे फकत एकदा माझी साथ ... 
-हृदयस्पर्शी 

No comments:

Post a Comment