Thursday, November 8, 2012

*नकोस सोडू साथ सखे ग*


नकोस सोडू साथ सखे ग, 
सरून जाईल बघ हे दाट धुके ग,
जाणतो मी तू पाहिली आहेस दुखाची गडद रात्र,
धीर धर राहिले काहीच क्षण मात्र, 
नाही मी चंद्र सूर्य, जे येती आणिक जाती,
मी आहे सोबत तुझ्याच जवळी, जसे शिंपल्यांसमवेत मोती,
मान्य आहे वाट ही खडतर आहे तुझ्या आयुष्याची,
पण होईल सुखकर जेव्हा साथ मिळेल या वेड्या जिवलगाची,
का तू व्यर्थ चिंता करतेस मनी, मी असेन सोबत नेहमी,
जरी नाही राहिले नाही या जगामध्ये इतर कोणी,
प्रेम माझे नाही खोटे, आहे खरे हे तू जाण ग,
तूच आहेस या वेड्या जीवाचा प्राण ग,
एवढ्याने घाबरून तू मानू नकोस हार,
तो बघ आनंदाचा उष:काल दूर नाही फार....
-हृदयस्पर्शी

No comments:

Post a Comment