ऑक्टोबर.... माझा आवडता मन प्रसन्ना करायला येतो,
सगळं वातावरण गुलाबी करायला येतो...
गुलाबी वातावरणात गुलाबी थंडी घेऊन येतो,
हळूच आवडत्या व्यक्तीची आठवण करवून देतो,
गुलाबी थंडीमध्ये प्रेमाची चाहूल करून देतो,
पावसाळ्यात ढगांतून पाणी पडताना पाहण्यापेक्षा हिवाळ्यात त्यांच्यासोबत चालायला आवडते,
कोणी सोबत असताना मनाला ढगांसोबत मनसोक्त बागडायला आवडते,
असा हा नवीन अशा घेऊन येणारा ऑक्टोबर मनात नवीन भाव जागृत करतो,
सगळीकडे नवचैतन्याने विश्वास मनात भरतो..
-हृदयस्पर्शी
No comments:
Post a Comment