*मी धन्य आहे *
आज अचानक अघटीत घडले,
आवाज तुझा ऐकून सारे वातावरणच बदलले,
तुझा आवाज ऐकण्यासाठी कान झाले होते केव्हाचे आतुर,
जसा कि पावसाचे आगमन लांबल्यावर चातक होतो चिंतातूर,
तुझा आवाज आला कानी,
क्षणभर आली मला ग्लानी,
वाटलं आज देव आपल्यावर मेहरबान झाला बरा,
पण मग कळले की त्याचा तर हा माझ्या भावनांशी चालणारा नेहमीचा खेळ सारा,
मनाला क्षणिक वाटले की तू परत येण्याचे ठरवलेस?
पण नेहमी प्रमाणें माझ्या मनाला, तू आज ही हरवलेस...
तुझ्यासाठी मी आता एकदम साधारण आणि अन्य आहे,
पण कामानिमित्त तरी आठवण काढतेस, यातच मी धन्य आहे..
कामानिमित्त तरी आठवण काढतेस, यातच मी धन्य आहे............
-हृदयस्पर्शी... :(
No comments:
Post a Comment