किती सहज म्हणालीस, आपली मैत्री तोडू नकोस,
किती सहज म्हणालीस मला सोडून जाऊ नकोस,
अशा वागण्याने तुझ्या किती त्रास होतो मला,
हे का समजंत नाही ग तुला?
रोजच्या रोज मरतो आहे मी,
हे का उमजत नाही ग तुला?
सर्व काही तू संपवलंस हे तू जाणतेस,
आणि तरी माझ्यासोबत असल्याचा आव असतेस...?
माझ्या भावनांशी खेळण्याचा हा तुझा कसला छंद आहे?
जेव्हा माझ्यासाठी तुझ्या हृदयाचा दरवाजा आधीच बंद आहे...
कामापुरता माझा वापर तर तू नेहमीच करत आलीस,
माझ्या हृदयाच्या जवळ असणारी तू एकदम अनोळखी झालीस..
आता कोठे माझं वेड मन तुझ्या धक्क्यांतून सावरतंय,
पण अजूनही ते तुझ्या आठवणीतच बावरतंय..
आपल्या प्रेमाला फक्त मैत्रीच नाव देताना तुला काहीच कसं वाटत नाही?
अशा गोष्टी बोलताना आपल्या आठवणींच पाणी तुझ्या डोळ्यांत कसं दाटत नाही...?
परत माझ्या मनाला भुरळ पाडून तुझ्याकडे ओढू नकोस..
परत माझ्या भावनांशी खेळून त्यांचे लचके तोडू नकोस...
तुझ्या बोलावण्याने मी आता परतणार नाहीये,
तुझ्या फसव्या बोलण्याला आता मी भुलणार नाहीये...
तुझ्या माझ्यात दूरीच हे अंतर आता बरच आहे,
तरी अजून तू म्हणतेस मला तुझी गरज आहे..?
खरंच तुला अजून माझी गरज आहे???
-हृदयस्पर्शी

No comments:
Post a Comment