ऐकलं की तू आज काल खूप उदास उदास असतेस,
खरं सांग तू कोणत्या जगात जगतेस?
चेहऱ्यावरील गोड हसू कुठे पळून गेलं,
शांतपणे विचार कर कोणी चोरून नेल?
स्वभाव ही म्हणे थोडा चिडचिडा झालाय,
मन म्हणत तुझ्याशिवाय किती कंटाळा आलाय...
मन तुझं आता नाही कशात रमत,
कोणीतरी पिडल्याशिवाय नाही तुला जमत,
का दूर झाला तो पिडणारा जिवलग,
कुठे चूक झाली जरा आठवून बघ..
चाकोरीतील जीवन आता तरी सोडून दे,
इवल्याश्या पंखात बळ भरून मुक्त आकाशी झेप घे,
जिवलग तुझा कोठेतरी मुक्त उडत आहे,
आतुर नजरेने तुझी वाट पाहत आहे....
खरं सांग तू कोणत्या जगात जगतेस?
चेहऱ्यावरील गोड हसू कुठे पळून गेलं,
शांतपणे विचार कर कोणी चोरून नेल?
स्वभाव ही म्हणे थोडा चिडचिडा झालाय,
मन म्हणत तुझ्याशिवाय किती कंटाळा आलाय...
मन तुझं आता नाही कशात रमत,
कोणीतरी पिडल्याशिवाय नाही तुला जमत,
का दूर झाला तो पिडणारा जिवलग,
कुठे चूक झाली जरा आठवून बघ..
चाकोरीतील जीवन आता तरी सोडून दे,
इवल्याश्या पंखात बळ भरून मुक्त आकाशी झेप घे,
जिवलग तुझा कोठेतरी मुक्त उडत आहे,
आतुर नजरेने तुझी वाट पाहत आहे....
No comments:
Post a Comment