Thursday, April 12, 2012

*तू माझ्या जवळ असशील*

तू कितीही दूर जा, तू माझ्या जवळ असशील,
डोळे बंद करून पाहीन तुला आणि तू माझ्या समोर असशील,
माझी प्रत्येक आठवण तू प्रत्येक क्षणी पुसशील,
दुख:  तर मला होईलच पण तू हि प्रत्येक क्षणी फसशील,
रोज मला कातरवेळी तुझी आठवण येईल,
आणि मावळत्या सुर्यासोबत अश्रूंची साठवण होईल,
कधी डोळे झाकल्यावर वारा  हळूच स्पर्शून जाईल,
भास तुझा होईल आणि मी हर्षून जाईन,
तू येशील परत म्हणून श्वास घेणे चालू राहील....
सुखापेक्षा दुखाचे प्रमाण  इथे जास्त आहे,
कारण सत्यापेक्षा असत्याची किंमत येथे रास्त आहे,
सर्व काही मिळालं आयुष्यात फक्त तुझं प्रेम बाकी होते,
जिवंतपणी मेलो तुझ्या वागण्याने, फक्त मला सर्वांनी जाळण बाकी होते...
खरच तुला माझ्या जीवनात येऊन जायचे होते का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुख: द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत नकळत माझे हृदय मी तुला दिले,
हृदयातच नव्हे तर मनात सुद्धा तुला बसवले,
कधी न रडणारा मी, पण तुझ्या वागण्याने मला रडवले,
जरी दूर गेलीस तरी मनात माझ्या तू राहशील,
तू कितीही दूर जा, तू माझ्या जवळ असशील,
तू कितीही दूर जा, तू माझ्या जवळ असशील...

No comments:

Post a Comment